
पोलिसांकडून वारंवार सावधानता बाळगण्याचे आवाहन करुनही ऑनलाइन फसवणुकीचे प्रकारात वाढ
वेगवेगळी आमिषे दाखवून व अनेक लोकांना ऑनलाईन व्यवहाराविषयी कमी माहिती असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातही ऑनलाइन फसवणुकीचे गुन्हे वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. ऑनलाइन फसवणुकीचे गुन्हे दररोज घडत आहेत. असे गुन्हे घडू नयेत व लोकांनी सावध राहावे यासाठी वेळोवेळी पोलीस यंत्रणेकडून, तसेच संबंधित बँकांकडून ऑनलाइन फसवणुकीबाबत सूचना देण्यात येऊनही लोकं काहीवेळेला बक्षिसाच्या आमिषापोटी तर काहीवेळेला तांत्रिक माहिती नसल्याने ऑनलाईन फसवणुकीला बळी पडत आहेत त्यामुळे ऑनलाइन व्यवहार करताना सावधानता बाळगावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे
www.konkantoday.com