किरकोळ व घाऊक व्यापार उद्योगांना एमएसएमईमधे समाविष्ट करण्याची सरकारने केली घोषणा,माजी आमदार बाळ माने यांच्याकडून केंद्राचे अभिनंदन

रत्नागिरी- सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय आणि रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज, एमएसएमईमध्ये किरकोळ आणि घाऊक व्यापार उद्योगांना समाविष्ट करुन त्यांच्यासाठी सुधारित मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय आणि रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल माजी आमदार बाळ माने यांनी अभिनंदन व्यक्त केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एमएसएमईंचे सबलीकरण करण्यासाठी, आर्थिक विकास गतीमान करण्याच्या दृष्टीने काम सुरू आहे. सुधारित मार्गदर्शक सूचनांचा लाभ अडीच कोटी किरकोळ आणि घाऊक व्यापाऱ्यांना होईल.

किरकोळ आणि घाऊक व्यापार उद्योग एमएसएमईच्या कक्षेबाहेर येत असत, परंतु आता सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार किरकोळ आणि घाऊक व्यापार उद्योगांना भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्राधान्याने कर्ज मिळवण्याचा लाभ घेता येणार आहे. या सुधारित मार्गदर्शक सूचनांद्वारे आता किरकोळ आणि घाऊक व्यापार उद्योगांना उद्यम नोंदणी पोर्टलवर नोंदणी करण्याची परवानगी दिली जाणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button