
स्वतः निर्बंध पाळून चिपळूण तालुक्यातील चार गावानी काेराेनाला रोखले
स्वतः निर्बंध पाळून चिपळूण तालुक्यातील चार गावानी काेराेनाला रोखले आहे चिपळूण तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधित रुग्णांची संख्या वाढली. मात्र, तालुक्यातील ४ गावे अद्यापही कोरोनाला भारी पडली आहेत. तालुक्यातील रावळगाव, बोरगाव, खोपड आणि तळवडे गावात गेल्या सव्वावर्षाच्या कालावधीत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही. या गावांतील लोकांनी कडक नियम पाळले. विविध वस्तूंच्या खरेदीसाठी एक-दोन व्यक्तींना पाठवले. लोकांनीच स्वतःवर निर्बंध घेतल्याने या गावात कोरोनाचा शिरकाव झालेला नाही.
www.konkantoday.com