
खडपोली निर्मल ग्रामपंचायत यांनी उभारलेले कोविड विलगीकरण केंद्र कौतुकास्पद – आमदार शेखर निकम
चिपळूण खडपोली येथे ग्रामपंचात वतीने कोविड विलगीकरण केंद्र उभारण्यात आले असून त्याची पाहणी आमदार शेखर निकम यांनी केले तसेच आर्थिक मदत केली. खडपोली गावातील तसेच येथे औद्योगिक वसाहत असून काही काही कंपन्यांमध्ये कोरोना रुग्ण वाढीचे प्रमाण देखील वाढले असून गावातील पॉजिटीव्ह रुग्णाची व्ययवस्था व्हावी या हेतूने हे विलगीकरण उभारण्यात आले आहे . तालुक्यामध्ये खडपोली ग्रामपंचायत हि पहिली ग्रामपंचायत आहे कि त्यांनी अशा प्रकारचे विलगीकरण केले आहे त्यांचे कौतुक करावे तितके कमी आहे असे आ. निकम म्हणाले. गावातील वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे तरुण तरुणी या हि स्वतःहून मदतीसाठी पुढे आलेत त्यानाही धन्यवाद दिले .
तालूक्यात कोरोनाची वाढती
रुग्णसंख्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि अपुरे पडणारे बेड्सची कमतरता हे सगळे बघता प्राथमिक शाळा खडपोली वाकणवाडी येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे.
www.konkantoday.com