
जिल्हा प्रशासन वादळाला तोंड देण्यासाठी सज्ज ,आज सायंकाळी६ वाजेपर्यंत सिंधुदुर्गात तर उद्या पहाटे ५ वाजेपर्यंत वादळ रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता -नामदार उदय सामंत
‘तौक्ते’ वादळाबाबत जिल्हा प्रशासन खबरदारीचे उपाय योजत वादळाला तोंड देण्यासाठी सज्ज आहे. आज संध्याकाळी सिंधुदुर्ग आणि उद्या पहाटे रत्नागिरी किनारपट्टीवर हे वादळ धडकण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क रहावे तसेच वेळोवेळी प्रशासन सूचना देईल त्याला सहकार्य करावे असे आवाहन उच्च व तंत्रशिणमंत्री उदय सामंत यांनी केले.
परिस्थिती पाहून किनापट्टीभागातील नागरिकांच्या स्थलांतराचा विचार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. मच्छीमारांना आवाहन केल्यामुळे १०० टक्के मच्छीमार किनार्यावर आले आहेत. किनार्यावर आलेल्या खलाशांची कोरोना चाचणी केली जाईल. सध्या वादळ केरळ किनारपट्टीवरून पुढे सरकत आहे. आज सायंकाळी६ वाजेपर्यंत सिंधुदुर्गात तर उद्या (ता. १६) पहाटे ५ वाजेपर्यंत वादळ रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे
दोन्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एनडीआरएफ टिमच्या संपर्कात आहेत. पोलिसांना, महसूल खाते यांना सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन बैठका या संदर्भात घेतल्या आहेत. प्रत्येकाने काळजी घ्या.नैसर्गिक आपत्ती असल्याने प्रशासनाने पूर्वतयारी केली आहे. विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या शक्यनेते सर्व कोविड सेंटर, रुग्णालयांच्या ठिकाणी जनरेटर सुविधा करण्यात आली आहे. ज्या क्षणाला प्रशासनाला आपली गरज लागेल तेथे मदत करावी, कोणत्याही परिस्थितीत जीवितहानी होणार नाही, यादृष्टीने आमचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले
www.konkantoday.com