
कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सिंधुदुर्गात अनेक ठिकाणी पाऊस
तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सिंधुदुर्गात अनेक ठिकाणी पाऊस सुरु झाला आहे. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना अवकाळी पावसामुळे दिलासा मिळाला आहे. विजांच्या कडकडाटासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. येत्या पाच दिवसांत जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
www.konkantoday.con