
ग्राहक आयोगाचा महावितरणला दणका,मृताच्या कुटुंबियांना १३ लाख ४४ हजार नुकसान भरपाई देण्याचा आदेश
रत्नागिरी :- शहरा लगतच्या नाचणे येथे विजेचा धक्का लागून झालेल्या मृत्यूप्रकरणी ग्राहक आयोगाने मृताच्या कुटुंबियांना १३ लाख ४४ हजार नुकसान भरपाई स्वरूपात मदत देण्याचा आदेश दिला. संजय अशोक पवार (४०, रा. नाचणे रत्नागिरी) विजेचा धक्का लागून मृत झालेल्याचे नाव आहे. त्याच्या कुटुंबियांकडून महावितरणविरूद्ध ग्राहक आयोगापुढे दावा दाखल केला होता.महावितरणच्या निष्काळजीपणामुळे संजय पवार यांचा मृत्यू झाल्याचे आयोगापुढे शाबीत झाल्याने हा निर्णय पारित झाला. दाव्यातील माहितीनुसार, संजय पवार यांचे नाचणे येथे घर असून तेथील वाढलेल्या झाडाला महावितरणच्या विद्युततारांचे घर्षण होत असे. फांद्यांमुळे तारांमध्ये घर्षण होवून घरात येणार्या सर्व्हिस लाईनचे आवरण उडाले होते. यामुळे पावसाळ्यात घराच्या ओल असलेल्या भिंतीला विजेचा प्रवाह जात होता. या संबंधीची तोंडी तक्रार मृताच्या नातेवाईकांकडून महावितरणकडे केली होती. मात्र काही ठोस उपाययोजना महावितरणकडून करण्यात आली नसल्याचा आरोप मृताच्य कुटुंबियांनी केला.दाखल केलेल्या दाव्यातील माहितीनुसार पवार हे १३ ऑगस्ट २०१७ रोजी भिंतीच्या बाजूने चालत जाताना ओल्या भिंतीला त्यांचा स्पर्श होवून विजेचा धक्का त्यांना बसला. या घटनेत संजय पवार यांचा जागीच मृत्यू झाला. www.konkantoday.com




