
ज्या दिवशी उपमुख्यमंत्रीपद जाईल, त्या दिवशी आमदार सोडा नारळपाणी विकणारा पण येणार नाही तुमच्याकडे-भाजपा नेते निलेश राणे
भाजपा नेते निलेश राणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. निलेश राणे यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवर त्यासंदर्भात पोस्ट केली असून यामध्ये थेट अजित पवारांना लक्ष्य करण्यात आलं आहे. “तुम्ही उपमुख्यमंत्री आहात. विचार करून बोललं पाहिजे”, असं निलेश राणे आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत. त्यामुळे आता या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा यांच्यामध्ये राजकीय कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत.भाजपामध्ये महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी असणाऱ्या निलेश राणेंनी शुक्रवारी सकाळीच ट्वीट करून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केलं. “अजित पवार म्हणतात माझ्याकडे किती भाजपाचे आमदार येतात ते पाहा. पवार साहेब, ते तुमच्याकडे नाही तर उपमुख्यमंत्र्यांकडे येतात. ज्या दिवशी उपमुख्यमंत्रीपद जाईल, त्या दिवशी आमदार सोडा नारळपाणी विकणारा पण येणार नाही तुमच्याकडे. तुम्ही उपमुख्यमंत्री आहात. विचार करून बोललं पाहिजे”, असं निलेश राणे म्हणाले आहेत.
www.konkantoday.com