खेड तालुक्यातील शिंगरी येथील घर आगीत भस्मसात

खेड ः खेड तालुक्यातील शिंगरी फौजदारवाडी येथील एका कौलारु घराला अचानक आग लागल्याने हे घर आगीत जळून भस्मसात झाले. या घटनेत जीवीत हानी झाली नसली तरी घराचे मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शिंगरी गावात राहणार्‍या पार्वती कदम या जेवण आटोपून शेजारच्या घरी गेल्या होत्या. रात्रौ अचानक त्यांच्या कौलारु घराला आग लागली. आग लागल्याचे कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली परंतु कदम यांचे घर आगीत भस्मसात झाले.

Related Articles

Back to top button