
पर्यटन, उद्योग राज्यमंत्री ना. अदिती तटकरे यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने रत्नागिरी जिल्हा संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती
पर्यटन, उद्योग राज्यमंत्री ना. अदिती तटकरे यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने रत्नागिरी जिल्हा संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा ना. जयंत पाटील यांनी केली. जिल्ह्यातील भौगोलिक समस्यांचा आढावा घेवून त्यासाठी आवश्यक असणार्या निधी मागणी संदर्भातील प्रस्ताव ना. तटकरे आघाडी शासनाकडे सादर करतील. विकासासाठी आवश्यक असणारा निधी जिल्ह्याला देण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव पाठविण्याची जबाबदारी ना. तटकरे यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे ना. पाटील यांनी जाहीर केले.
www.konkantoday.com




