
वाढीव बिलाच्या विरोधात चिपळूणात नॅशनलिस्ट कंझ्युमर प्रोटेक्शन ऑर्गनायझेशनचे उपोषण
महावितरण कंपनीने लॉकडाऊन काळातील वाढीव वीज बिले ग्राहकांच्या माथी मारून त्यांना हैराण केले आहे. हाताला काम नसल्याने ही भरमसाठ वीज बिले भरायची कुठून असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. याबाबतच्या असंख्य तक्रारी नॅशनलिस्ट कंझ्युमर प्रोटेक्शन ऑर्गनायझेशनकडे आल्या असून यासंदर्भात पाठपुरावा सुरू आहे. मात्र महावितरण कंपनीच्या अधिकार्यांकडून समर्पक उत्तरे मिळत नसल्याने २८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वा. लाक्षणिक उपोषण केले जाणार असल्याची माहिती संघटनेच्या जिल्हाध्यक्षा रंजिता ओतारी व सचिव डॉ. शमिना परकार यांनी दिली.
konkantoday.com