bमारुती मंदिर येथील चर खोदाईची नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी दखल घेतली

रत्नागिरी शहरात गेल्या काही दिवसापासून नळपाणी योजनेचे काम सुरू असून हे पाइप रस्त्याच्या आतील बाजूने घालण्यात येत आहेत मारुती मंदिर येथील सर्कल जवळ रस्त्यात पाईपलाईन साठी खोदाई केल्यानंतर त्यानंतर त्या ठिकाणी मातीच्या ढिगारा झाला होता त्यामुळे नागरिकांना व वाहनचालकांना मोठा त्रास होत होता याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर नगराध्यक्ष बंड्या साळवी याने स्वतः जातीने यात लक्ष घालून या खोदलेल्या भागाचे त्या ठिकाणी झालेल्या ढिगार्‍याचे सपाटीकरण करून घेतले नगराध्यक्ष यांनी केलेल्या कारवाईबद्दल त्यांचे कौतुक होत असले तरी हे सपाटीकरण करण्याची जबाबदारी कंत्राटदाराची आहे की कुणाची तसे असेल तर मग शहरात इतर ठिकाणी देखील खोदलेल्या सपाटीकरण देखील कंत्राटदारांकडून करून घ्यावे अशी मागणी होत आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button