
UGC ने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात दिलेली मार्गदर्शक तत्वे म्हणजे सर्वानाच धक्का आहे-मंत्री उदय सामंत
यूजीसीने नुकतेच परीक्षा घेण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केला होत्या.या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे सप्टेंबरमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास अनुकूलता यूजीसीने दाखवली होती. यूजीसीने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात दिलेली मार्गदर्शक तत्वे म्हणजे सर्वानाच धक्का आहे असे मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रातील कोवीडची परिस्थिती माहित असताना हा निर्णय म्हणजे अंतिम वर्षाच्या विध्यार्थ्यांच्या जिवाशी खेळल्यासारखे आहे.या संदर्भात मी परत केंद्र सरकारला श्री.रमेश पोखरियाल केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री यांना पत्र लिहिले आहे असे ना.सामंत यांनी सांगीतले.विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दिनांक ६ जुले, २०२० रोजीच्या सूचना या आयोगाच्या या पूर्वीच्या सुचनांप्रमाणेच बंधनकारक नसून केवळ मार्गदर्शक स्वरुपाच्या आहेत,असे माझे मत आहे.त्यामुळे सध्याच्या कोवीड महामारीच्या
अनिश्चिततेच्या परिस्थितीमध्ये विद्यार्थी हा घटक शेक्षणिक परिसंस्थेचा केंद्रबिंदू असल्याने,त्याचे शारिरीक, मानसिक स्वास्थ,भवितव्य आणि हिताचा विचार करुन अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना योग्य त्या सूत्राच्या अाधारे पदवी प्रदान करण्याबाबत आपण एकसमान मार्गदर्शक सूचना निर्गमित कराल,अशी मला आशा आहे असे मंत्री उदय सामंत यांनी या पत्रात म्हटले आहे.
www.konkantoday.com