
रत्नागिरी नगर परिषदेची कचर्याची घंटागाडी की सूचना गाडी? नागरिकांना पडला सवाल
रत्नागिरी नगर परिषदेच्या शहरातून विविध भागात फिरणार्या कचरा गाड्यांवर लाऊडस्पिकर यंत्रणा बसविण्यात आली आहे. पूर्वी या गाड्यांवर घंटा बसविण्यात येत होत्या. प्रत्येकाच्या घराजवळ आल्यावर घंटा वाजवून कचरा गोळा केला जात होता. त्यानंतर आता त्यामध्ये सुधारणा होवून लाऊडस्पिकरची यंत्रणा बसविण्यात आली आहे. या कचरागाड्या शहरातील विविध भागात फिरत असल्यामुळे त्यावर कोरोनाच्या जागृतीसाठी व त्याबाबत नागरिकांनी पाळावयाच्या सूचना याबाबत माहिती देण्यात येत होती. दोन दिवसांपूर्वी चक्रीदळामुळे याही सूचना देण्यात येत होत्या. ही योजना चांगली असली आहे. त्यामुळे नागरिकांपर्यंत योग्य ते संदेश जात आहे. मात्र हे करीत असताना या घंटागाडीवरील घंटेचा आवाज मात्र गायब झाला आहे. सुरूवातीच्या काळात लाऊडस्पिकरवरून घंटेचा आवाज ऐकू येत असे व त्यानंतर संबंधित सूचना केल्या जात असत. मात्र सध्या यात सध्या फक्त घंटेचा आवाज न येता थेट सूचना येत असल्याने नेमकी कचरा गाडी आली आहे की आणखी नगरपालिकेतर्फे सूचना देण्यार्या गाड्या येत आहे हे नागरिकांना कळू शकत नाही. कारण शहरात पाणी पुरवठा होत नसला तरी अशाच लाऊडस्पिकर लावून रिक्षा फिरविण्यात येते. काहीवेळेला करवसुलीची गाडीही लाऊडस्पिकर लावून फिरते. त्यामुळे नेमकी कचरा गाडी आली की नाही हे त्यातून घंटेचा आवाज वगळल्याने नागरिकांना कळू शकत नाही. त्यामुळे पूर्वीप्रमाणे घंटेच्या आवाजानंतर नगरपरिषदेला ज्या काही सूचना द्यावयाच्या आहेत त्या देण्यात याव्यात अशी नागरिकांची मागणी आहे.
www.konkantoday.com