
रत्नागिरी जिल्ह्यात चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ३ जून रोजी जिल्ह्यात संचारबंदीचे जिल्हाधिकारी यांचे आदेश
रत्नागिरी जिल्ह्यासह किनारपट्टीला दिनांक २ ते ३ जून या कालावधीत चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे या चक्रीवादळामुळे जीवित व वित्त हानी होऊ नये म्हणून बुधवार दिनांक ०३ जून २०२० रोजी लोकांना त्यांच्या अत्यावश्यक सेवा विषयक बाबीसाठी वगळून अन्य कोणत्याही गोष्टीसाठी जिल्ह्यात एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी संचार करण्यास बंदी करण्यात आली आहे. सदर कालावधीत लोकांनीघराबाहेर पडू नये लोकांनी घरातच सुरक्षित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. संचारबंदीचा हा आदेश जिल्हाधिकारी यांनी जाहिर केला आहे
www.konkantoday.com
