लिटील व्हॉईस ऑफ रत्नागिरीचे सहावे पर्व रंगणार आज ७ जानेवारीला

जिल्ह्यातील बाल संगीत कलाकारांच्या टॅलेंटला संधी देणार्‍या लिटिल व्हॉईस ऑफ रत्नागिरीचे सहावे पर्व आज ७ जानेवीराला सायंकाळी ६.३० वाजता स्वा. सावरकर नाट्यगृहात रंगणार आहे. मँगो इव्हेंटसतर्फे आयोजित पहिल्या पाच पर्वामधील विजेत्यांचे ‘रागा टू रॉक’ या कार्यक्रमात अनोखे सादरीकरण या वर्षी रत्नागिरीकर रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. शास्त्रीय, उपशास्त्रीय, लोकगीत, सुगम आणि रॉक संगीत एकाच रंगमंचावर या कलाकारांकडून ऐकता येणार आहे.
या कार्यक्रमात ‘सूर नवा ध्यास नवा’चा विजेता प्रसिद्ध गायक अनिरुद्ध जोशी याची गीतेही ऐकण्याची पर्वणी लाभणार आहे. पाचही पर्वांमधील विजेते इशानी पाटणकर, चैतन्य परब, रागिणी बने, कुणाल साळवी, आदित्य पंडित, आदित्य लिमये, निधी फणसेकर, स्वरा भागवत (रत्नागिरी), सिद्धी शितूत, श्रेया भागवत (देवरुख), गौतमी वाडकर (संगमेश्‍वर), श्रेया जोशी, हर्षाली कालेकर व नीरजा बाईत (दापोली), सुश्रुती तांबे (सावर्डे) आणि साक्षी उत्पात हे कलाकार सादरीकरण करतील. या कलाकारांचे कौतुक करण्यासाठी खासदार विनायक राऊत, कॅबीनेट मंत्री उदय सामंत, उद्योजक भैय्या सामंत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
रत्नागिरीतील बाल कलाकारांना संधी देतानाच त्यांच्या टॅलेंटला छोट्या पडद्यावरील सूर नवा ध्यास नवा व अन्य संगीत, रिअ‍ॅलिटी शोमध्ये यातील सात कलाकारांना आतापर्यंत संधी मिळाली आहे, हे या कार्यक्रमाचे यश आहे, असे मँगो इव्हेंट्सचे प्रमुख अभिजित गोडबोले यांनी सांगितले. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून आजपर्यंत कोणत्याही स्पर्धकांकडून कोणतेही शुल्क घेतलेले नाही. या कलाकारांनी सर्व प्रकारची गाणी गायली पाहिजेत, याकरिता लिटिल व्हॉईसचा आग्रह असतो. त्यामुळेच या कलाकारांकडून शास्त्रीय ते रॉक संगीत असा अनोखा कार्यक्रम सादर होणार आहे.
येथील प्रतिथयश उद्योजक आणि नूतन कॅबीनेट मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त गेली सहा वर्षा ७ जानेवारीला हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. याकरिता दिलसे क्रिएशन्स, एस कुमार्स साऊंड सर्व्हिस, स्मार्ट फोटो, ऑफबिट आर्टिस्ट, ओम साई डेकोरेटर्स, शेड ग्राफीक्स, नितीन लिमये, प्रभात कॅटरर्स यांचे बहुमूल्य योगदान लाभत असल्याचे गोडबोले म्हणाले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button