आमदार शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण शहर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे ११जूनला रक्तदान शिबिराचे आयोजन

संपूर्ण देश कोरोना विषाणूच्या विरोधात लढत आहे. महाराष्ट्रामधे आपल्या जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांना रक्ताची कमतरता भासू नये म्हणून चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम सर यांच्या पुढाकाराने चिपळूण शहरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यातील चिपळूण शहरामध्ये होणाऱ्या या रक्तदान शिबिराचे नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने होणार आहे. शिबिरा संदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक तालुका अध्यक्ष जयंद्रथ खताते व शहर अध्यक्ष मिलिंद कापडी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला. सुचय अण्णा रेडीज. सतीश खेडेकर , शिरीष काटकर, विनायक पवार, श्री. मनोज जाधव, श्री सचिन साडविलकर,अक्षय केदारी , ऋतुजा चौगुले व पदाधिकारी उपस्थित होते. शिबिराचे नियोजन ११ जून रोजी सकाळी १० ते ३ यावेळेत सह्याद्री शिक्षण संस्थेचे महिला पाग विद्यालय पाग चिपळूण याठिकाणी

करण्यात आले आहे.सदरचे शिबीर कन्या शाळा ,पाग येथे होणार आहे. सोशल डिस्टंसिन्ग व नियमांचे पालन करण्याकरिता रक्तदात्यांनी आधीच नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीकृत दात्याला वेळ देण्यात येईल व त्यावेळेत रक्तदान करता येईल. दाता quaratine भागातील किंवा प्रादुर्भाव असलेल्या भागातील नसावा. नाव,पत्ता,फोन नं. ई. माहितीसह नोंदणी करावी.
आयोजन शिबिराकरीता रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाची रक्तपेढी लाभणार आहे
तरी सर्व रक्तदात्यानी खालील नंबरवर आपली नावे त्वरित नोंदवावी व रक्तदान करावे असे आवाहन आमदार शेखर निकम यांनी केले आहे
नाव नोंदविण्यासाठी
चिपळूण विभाग
विनायक पवार – 9921910920 ,मनोज जाधव – 9423293999,सचिन साडविलकर- 9028761699,अक्षय केदारी – 9561117674
यांच्याकडे संपर्क करण्याचे कळविण्यात आले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button