
प्रजासत्ताक दिन २०२७: अखिल भारतीय नौसैनिक स्पर्धेच्या निवड शिबिरासाठी रत्नागिरीत सागरी कॅम्प; २२ ऑक्टोबरला भगवती जेट्टीवरून मोहिमेचा प्रारंभ
रत्नागिरी, दि. २१ ): प्रजासत्ताक दिन २०२७ निमित्त नवी दिल्ली येथे आयोजित होणाऱ्या ‘अखिल भारतीय नौसैनिक स्पर्धे’च्या (All India Nau Sainik Camp) पूर्वतयारी व निवड शिबिरासाठी राष्ट्रीय स्तरावरील नौसैनिक सागरी कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २२ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत रत्नागिरी ते पालशेत अशा समुद्र मार्गावर हे शिबीर पार पडणार आहे. या सागरी कॅम्पचे आयोजन एनसीसी ग्रुप मुख्यालय कोल्हापूरचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर आर. के. पैठणकर, एनसीसी संचालनालय मुंबई (भारतीय नौदल) चे संचालक कॅप्टन जेनिस जॉर्ज आणि २ महाराष्ट्र नवल युनिट एनसीसी रत्नागिरीचे कॅम्प कमांडंट कमांडर रामानुज दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.
या शिबिराशी संबंधित ‘कोकण ज्ञान तरंग सागरी मोहीम २०२६’ चा फ्लॅग-ऑफ (समारंभपूर्वक शुभारंभ) सोहळा गुरुवार, दि. २२ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता रत्नागिरी येथील भगवती जेट्टीवर संपन्न होणार आहे, अशी माहिती कॅम्प कमांडंट कमांडर रामानुज दीक्षित यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.




