महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियन्स ट्रॉफीची निवडचाचणी संपन्न

महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियन्स लीग स्पर्धेचे संस्थापक आणि अध्यक्ष मा. ना. उदयजी सामंत साहेब व आमदार श्री. किरण सामंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ सोलकर फाउंडेशन आयोजित महाराष्ट्र टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेसाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग व कोल्हापूर येथील खेळाडूंची निवड चाचणी दि. 17 व 18 ऑक्टोबर 2026 रोजी लांजा येथील खानविलकर मैदानावर पार पडली. या निवड चाचणीचे उदघाट्न रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असो. चे उपाध्यक्ष व नगरसेवक श्री बाळू साळवी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी एकनाथ सोलकर फाउंडेशनचे फाउंडर श्री. ब्रिजेश सोलकर, भरत लोहार, दीपक पवार, भूपेंद्र सिन्हा, प्रवीण घेवारी गणेश कामटे निवड चाचणी साठी मुबंईतील नामवंत माजी क्रिकेट खेळाडू उमेश मांजरेकर, कल्याणी घोरपडे, करुणा कोटीयान,,प्रशांत गावडे, तसेच रत्नागिरीतील दीपक मोरे, दिवाकर मयेकर, सईद मुकदम, गिरीश कोचरेकर, दिनेश माईन, सोनम चव्हाण, सुधा पवार हे उपस्थितीत होते.
या निवडचाचणी मध्ये, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पुणे, मुबंई येथील 125 मुलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियन लीगसाठी खेळाडूंची निवड चाचणी 9 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर 2026 या कालावधीत महाराष्ट्रभर होत आहे. ही महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी मोठी संधी आहे. या निवड चाचणीसाठी महाराष्ट्रातून आता पर्यत 1500 खेळाडूंनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले आहे. याशिवाय स्पॉट रजिस्ट्रेशनसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात खेळाडू उपस्थित रहात आहेत.
आता पर्यत 9 ऑक्टोबरला बीड, जालना, नांदेड, परभणी, व हिंगोली या जिल्ह्यासाठी संभाजीनगर येथे दि. 10 ऑक्टोबर रोजी अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वासीम, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, व वर्धा, या जिह्यासाठी अकोला येथे, 11 ऑक्टोबर रोजी नासिक, अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार, जळगांव या जिल्ह्यासाठी शिर्डी येथे, निवडचाचणी पार पडल्या आहेत.

यापुढील निवडचाचणी

22 ऑक्टोबर रोजी सोलापूर, सांगली, धाराशिव, व लातूर या जिल्ह्यासाठी सोलापूर येथे,

24 व 25 ऑक्टोबर रोजी पुणे व सातारा जिल्ह्यासाठी पुणे येथे

28 व 29 ऑक्टोबर रोजी रायगड जिल्ह्यासाठी रायगड येथे

31 ऑक्टोबर रोजी पालघर येथे पालघर जिल्ह्यातील खेळाडूंसाठी

2 व 3 नोव्हेंबर रोजी ठाणे जिल्ह्यासाठी भिवंडी येथे

आणि 4 नोव्हेंबर रोजी मुबंई मधील खेळाडूंसाठी विक्रोळी येथे निवड चाचणी पार पडणार आहे.

या निवडचाचणीचा महाराष्ट्रातील सर्व टेनिस खेळाडूंनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन संस्थापक मा. ना. उदयजी सामंत साहेब यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button