
मच्छिमारांना खरेदी करणार्या कंपन्यांकडून केवळ २५ रुपये प्रतिकिलो इतका दर
दापोली सध्या मच्छीमारांना समुद्रात मोठ्या प्रमाणात कमी महत्वाचे मासे अर्थात फिशमिल मिळत असले तरी हे फिशमिल खरेदी करणार्या कंपन्यांकडून केवळ २५ रुपये प्रतिकिलो इतका अतिशय तुटपुंजा दर दिला जात आहे. यामुळे मच्छीमारांना डिझेल आणि इतर दैनंदिन खर्च भागवणे कठीण होत आहे.
सध्या बाजारात डिझेलचा दर १४५ रुपये प्रति लिटरवर पोहोचल्याने मच्छीमारांसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. दुसरीकडे हवामानात होत असलेल्या सततच्या बदलामुळे म्हाकुळ, कोळंबी, सुरमई आणि बांगडे यांसारख्या माशांच्या उपलब्धतेत मोठी घट झाली आहे या माशांनाही पाहिजे तसा दर नाही. यातच एलईडी लाईट्सचा वापर आणि पर्ससीन नेटच्या अवैध मासेमारीमुळे स्थानिक पारंपरिक मच्छीमारांचे अतोनात नुकसान होत आहे.




