जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी नाव नोंदणीचे आवाहन जिल्ह्यातील कुशल तरुणांना ऑलिम्पिक स्तरावर चमकण्याची संधी


रत्नागिरी, दि. १५ ): आगामी ‘जागतिक कौशल्य स्पर्धा २०२६-२७’ साठी जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय स्तरावरून गुणवत्तापूर्ण आणि कुशल उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील इच्छुक व पात्र तरुण-तरुणींनी https://skillindiadigital.gov.in/ या संकेतस्थळावर त्वरित नाव नोंदणी करून या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त दत्ता चव्हाण यांनी केले आहे.
दर दोन वर्षांनी होणारी जागतिक कौशल्य स्पर्धा (WorldSkills Competition) ही जगातील व्यावसायिक शिक्षण व कौशल्य उत्कृष्टतेची सर्वात मोठी व्यासपीठ मानली जाते. २३ वर्षांखालील तरुणांसाठी कौशल्य सादरीकरणाचे हे एक प्रकारचे ‘कौशल्यांचे ऑलिम्पिक’च आहे.
या स्पर्धेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, विविध सेक्टर स्किल कौन्सिल्स आणि औद्योगिक आस्थापनांच्या सहकार्याने एकूण ५६ कौशल्यांशी संबंधित स्पर्धा टप्प्याटप्प्याने जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवर घेण्यात येतील. यातून अंतिम निवड झालेल्या कुशल उमेदवारांचे नामांकन जागतिक स्पर्धेसाठी करण्यात येईल.
पात्रतेचे निकष व वयोमर्यादा:

  • सर्वसाधारण वयोमर्यादा: उमेदवाराचा जन्म १ जानेवारी २००३ किंवा त्यानंतरचा असावा.
  • विशेष टीम स्किल्स:
  • सायबर सिक्युरिटी, इंडस्ट्री ४.०, मेकॅट्रॉनिक्स, रोबोट सिस्टीम इंटिग्रेशन: जन्म १ जानेवारी २००३ किंवा त्यानंतरचा असावा.
  • ऑटोनॉमस मोबाईल रोबोटिक्स, काँक्रीट कन्स्ट्रक्शन वर्क, लँडस्केप गार्डनिंग: जन्म १ जानेवारी २००६ किंवा त्यानंतरचा असणे अनिवार्य आहे.
    स्पर्धेच्या सविस्तर माहितीसाठी अथवा नोंदणीदरम्यान काही अडचण आल्यास उमेदवारांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, एमआयडीसी मिरजोळे, नाचणे, रत्नागिरी येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button