STचा प्रवाशांना मोठा दिलासा! भाडेवाढीचा प्रस्ताव MSRTCने केला नामंजूर


दरवर्षी दिवाळीच्या गर्दीच्या काळात एसटीच्याप्रवासी भाड्यात हंगामी वाढ केली जाते. यंदाही १ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत प्रवासी भाड्यात सरसकट १५ टक्के वाढ करण्याचाप्रस्ताव एसटी प्रशासनाने मंत्री सरनाईक यांच्याकडे सादर केला होता. मात्र, आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या जनतेवर आणखी भार टाकणे योग्य नसल्याची भूमिका घेत त्यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला.

दुष्काळाच्या झळांनी होरपळणारा शेतकरी, महागाईमुळे आर्थिक ओढाताण सहन करणारा सर्वसामान्य नागरिक आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना होणारी दमछाक, अशा परिस्थितीत जनतेवर भाडेवाढीचा अतिरिक्त भार कशासाठी, असा सवाल उपस्थित करत परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिवाळीच्या गर्दीच्या हंगामासाठी एसटीची प्रस्तावित १५ टक्के हंगामी भाडेवाढ नामंजूर केली.एसटीच्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी पर्यायी मार्ग शोधू; मात्र अडचणीत असलेल्या जनतेला दिलासा देण्याचे कर्तव्य विसरणार नाही, या भूमिकेतून मंत्री सरनाईक यांनी प्रस्तावित भाडेवाढीला नकार देत सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला. एसटीची लालपरी ग्रामीण महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, नोकरदार व ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवासाचे महत्त्वाचे साधन आहे. दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकरी कुटुंबांसह महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन खर्चात भाडेवाढीमुळे भर पडली असती. त्यामुळे प्रवाशांना दिलासा देण्याच्या भूमिकेतून एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button