सरन्यायाधीश सूर्य कांत यांचा विरोधकांना भेटण्यास नकार ; INDIA आघाडी मात्र मोर्चावर ठाम!



नवीदिल्ली : CJP अर्थात कॉक्रोच जनता पार्टीने शनिवारी १० ऑक्टोबर रोजी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन केल्यानंतर आता INDIA आघाडीनं आक्रमक धोरण स्वीकारलं आहे.

लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीसह सर्व विरोधी पक्षांनी कथित वोट चोरीविरोधात दिल्लीतील मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. सोमवारी राजधानी दिल्लीत इंडिया आघाडीच्या सर्व प्रमुख पक्षांसह काँग्रेस थेट सरन्यायाधीश सूर्य कांत यांची भेट घेण्यासाठी मोर्चा काढणार आहे. मात्र, एकीकडे मोर्चासाठी विरोधक सज्ज होत असतानाच दुसरीकडे सरन्यायाधीशांनी यासंदर्भात विरोधकांना भेटण्यासाठी नकार दिला आहे. एका इमेलमध्ये सरन्यायाधीशांनी भेटीसाठी नकार देण्याची कारणं कळवल्याचं एएनआयनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी विरोधकांना काय सांगितलं?

पीटीआयनं सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी विरोधकांना दोन घटनात्मक संस्थांमधील कार्यक्षेत्रांच्या विभागणीचा मुद्दा सांगितला आहे. प्रशासकीय मुद्द्यांबाबत कार्यकारी मंडळाच्या कामकाजात सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही, असं सरन्यायाधीशांनी नमूद केलं आहे. त्याशिवाय, याबाबत काँग्रेसने न्यायालयात याचिका दाखल करावी, ज्यावर मंगळवारी सुनावणी घेता येऊ शकेल, असंदेखील सरन्यायाधीशांनी कळवल्याचं पीटीआयने वृत्तात नमूद केलं आहे. ज्या नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं हनन झालेलं आहे, अशा नागरिकांसाठी सर्वोच्च न्यायालय २४ तास उपलब्ध आहे, असंदेखील सरन्यायाधीशांनी यासंदर्भात स्पष्ट केलं आहे.

राहुल गांधींचं सर्व विरोधकांना आवाहन

लोकसभा विरोधी पक्षनेते व काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयापर्यंत मोर्चा काढण्याचं आवाहन केलं आहे. यामध्ये इंडिया आघाडीसोबतच सर्व विरोधी पक्ष, सामाजिक संस्था व तरुण वर्गाला सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी इंडिया आघाडीनं केली असून Special Intensive Revision अर्थात SIR प्रक्रिया तातडीने थांबवण्याच्या मागणीचाही त्यात समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button