राज्यातील विद्यापीठांमध्ये ३५ वर्षांनी पुन्हा उडणार निवडणुकांचा धुरळा, सरकारचा मोठा अ‍ॅक्शन प्लॅन तयार


राज्यातील ५ ठिकाणच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकांच्या घोषणेनंतर आता विद्यापीठांमध्येही निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. जवळपास ३५ वर्षानंतर राज्यातील विद्यापीठांमध्ये निवडणुका पार पाडणार आहेत. त्यासाठी सरकार नवा अॅक्शन प्लॅन तयार केलाय. विद्यापीठांमध्ये अभ्यासपूर्ण, शिस्तीत आणि निकोप निवडणुका पार पाडण्यासाठी १२ सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आलीय.

राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्थांमध्ये विद्यार्थी परिषद निवडणुका घेण्याबाबत राज्य शासनाने उच्चस्तरीय तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आलीय. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना झालीय. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ अंतर्गत होणाऱ्या या निवडणुकांच्या प्रक्रियेचा सखोल अभ्यास करून त्याबाबत मार्गदर्शक सूचना व धोरणात्मक शिफारसी करण्याची जबाबदारी या समितीवर सोपविण्यात आलीय. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय गुरुवारी जारी केलाय.महिला, अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी, भटक्या-विमुक्त जाती, तसेच NSS-NCC आणि क्रीडा-सांस्कृतिक विभागांना योग्य वाटा देण्यासाठी शिफारशी केल्या जाणार आहेत. विद्यार्थी परिषदांच्या संपूर्ण निवडणूक डिजिटल करण्याबाबतही शिफारसी केल्या जाणार आहेत. १२ सदस्यीय समिती महिनाभरात अहवाल सादर करणार आहे. पुढच्या शैक्षणिक वर्षाच्या आधीच निवडणुकांबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button