
राष्ट्रीय चित्रकला शिबिरात प्रकाश राजेशिर्के यांचा सहभाग
नॉर्थ इस्ट हरित संमेलनाचे औचित्य साधून कलकत्ता विभागीय केंद्राच्यावतीने नवी दिल्ली येथे ललित कला अकादमीतर्फे राष्ट्रीय चित्रकला शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी अनेक राज्यांतून निवड झालेल्या निवडक ११ कलावंतांमध्ये चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील ज्येष्ठ चित्रकार, शिल्पकार प्रा. प्रकाश राजेशिर्के यांचा सहभाग होता.
या शिबिरासाठी बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश अशी अनेक राज्ये सहभागी झाली होती. अशा अनेक राज्यातून निवडक अकरा जाणकार तज्ञ कलाकारांची निवड करण्यात आली होती. यामध्ये प्रा. प्रकाश राजेशिर्के यांचा समावेश होता. राजेशिर्के हे सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सह्याद्री स्कूल ऑफ आर्टचे चेअरमन असून माजी प्राचार्य आहेत.
www.konkantoday.com