आरतीनंतर जमिनीच्या वादातून मारहाण


गणपतीच्या आरतीनंतर सहा महिन्यापासून सुरु असलेल्या जमीन वादाची चर्चा करताना वाद विकोपाला गेला. यातूनच तरुणाला पितळेच्या टाळाने मारहाण करण्यात आली. हा प्रकार सोडवण्यासाठी गेलेल्या त्याच्या पत्नीलाही दुखापत झाल्याची घटना तालुक्यातील नांदगाव-भुवडवाडी येथे शुक्रवारी ७.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी शनिवारी ९ जणांवर सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. राकेश सुरेश लाखण, सोमा जिरु लाखण, विजय शंकर ठोंबरे, संजय शंकर ठोंबरे, प्रवीण गजानन ठोंबरे, किरण मारुती ठोंबरे, प्रदीप गजानन ठोंबरे, गजानन लक्ष्मण ठोंबरे, मारुती लक्ष्मण ठोंबरे (सर्व, नांदगाव-भुवडवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. याबाबतची फिर्याद वैभव गणपत ठोंबरे (३१, नांदगाव-भुवडवाडी) यांनी दिली असून या मारहाणीत त्यांच्यासह त्यांची पत्नी विधी वैभव ठोंबरे अशी जखमी झालेल्याची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैभव ठोंबरे यांच्या घरी गणपतीची आरतीसाठी वाडीतील लोक आलेले होते. आरती झाल्यावर त्यांनी गजानन ठोंबरे, मारुती ठोंबरे याच्याशी सहा महिन्यापासून सुरु असलेल्या जमिनीच्या वादाबाबत चर्चा करत होते. यावेळी वाद वाढला. वैभव ठोंबरे यानी त्याना आपण समंजसपणाने बोलूया असे सांगताच ९ जणांनी त्यांना मारहाण केली. संजय ठोंबरे, प्रवीण ठोंबरे यानी टाळ त्यांच्या डोक्यात व पाठीवर मारल्याने यात ते जखमी झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button