दापोलीत होणार्‍या अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध


दापोली तालुक्यातील वणोशी तर्फे पंचनदी गावाच्या परिसरात प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाच्या मुद्यावरून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अणुऊर्जा प्रकल्पामुळे शेतीपिके, समुद्री जीवसृष्टी, मत्स्य व्यवसाय आणि मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर शासनाने स्थानिकांना सविस्तर आणि अधिकृत माहिती द्यावी, प्रकल्पाची संपूर्ण वस्तुस्थिती ग्रामस्थांसमोर मांडावी आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावीत, अशी मागणी करण्यात आली. वणोशी तर्फे पंचनदी गावाच्या परिसरात अणुऊर्जा प्रकल्प प्रस्तावित असल्याची माहिती समोर आल्यानंतर ग्रामस्थांनी या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे. प्रकल्पामुळे शेती, पर्यावरण, समुद्रातील जीवसृष्टी, मत्स्य व्यवसाय तसेच मानवी आरोग्यावर होणार्‍या संभाव्य परिणामांबाबत ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button