
परशुराम घाटाजवळ गांजा सेवन करताना तरुण ताब्यात
हॉटेल शिवसागरच्या तळमजल्यातील प्रकार; खेड पोलिसांत एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल
खेड : परशुराम घाटाजवळील हॉटेल शिवसागरच्या तळमजल्यात गांजाचे सेवन करताना एका २४ वर्षीय तरुणाला खेड पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई सोमवार, दि. १४ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे १.४५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिषेक कुमार रमन यादव (वय २४), सध्या रा. हॉटेल शिवसागर, परशुराम घाटाजवळ, ता. खेड, जि. रत्नागिरी, मूळ रा. चकला, ता. चनमनखी, जि. पूर्णिया, बिहार, हा हॉटेलच्या तळमजल्यात गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करताना आढळून आला.
या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३०८/२०२६ नुसार अंमली औषधी द्रव्ये व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम १९८५ मधील कलम ८(क), २७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल अशोक विक्रम मुंडे (ब.नं. २६७) यांनी फिर्याद दिली. गुन्हा दि. १४ सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आला असून, पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत.




