लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर


रत्नागिरी: लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे गेल्या २५ वर्षांपासून शिक्षक दिनाचे औचित्य साधून आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी लायन्स आय हॉस्पिटल येथे आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमास गोगटे महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ श्रीकृष्ण जोशी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी लायन्स क्लब चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. संतोष बेडेकर, रीजन चेअरमन डॉ. निलेश पाटील, झोन चेअरमन ला. शिल्पा पानवलकर, लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष सुमित ओसवाल, सचिव ललित शहा व खजिनदार प्रदीप हरचिकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

यावर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सात शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

कै. ल. ग. पटवर्धन स्मरणार्थ, लायन एच. एल. पटवर्धन पुरस्कृत पुरस्कार

  • सौ. गीताली शिवलकर – परशुराम पंत अभ्यंकर प्राथमिक विभाग
  • श्री. मोहन भास्कर बापट – फाटक हायस्कूल
  • श्री. योगेश मोरबाळे गांगण – केळकर कॉलेजद्वारा फाटक हायस्कूल

सौ. राजश्री गडकरी स्मृतिप्रीत्यर्थ, लायन शिल्पा पानवलकर पुरस्कृत पुरस्कार

  • सौ. प्रज्ञा काळे – आनंदी परशुराम अभ्यंकर बाल मंदिर

श्री. अविनाश मोरे स्मृतिप्रीत्यर्थ, ला. साक्षी धुरी पुरस्कृत पुरस्कार

  • सौ. ममता गावडे – अंगणवाडी सेविका, शिरगाव

पै. हुसैनखान फडनाईक स्मृतिप्रीत्यर्थ, ला. ॲड. शबाना वस्ता पुरस्कृत विशेष पुरस्कार

  • प्रा. बाबासाहेब सुतार

सौ. अलका देव स्मृतिप्रीत्यर्थ, लायन डॉ. शिवानी पानवलकर पुरस्कृत पुरस्कार

  • सौ. शर्वरी करगुटकर – विज्ञान विभाग, जिल्हा परिषद शाळा, मेरवी

शिक्षकांनी आपल्या शैक्षणिक क्षेत्रात केलेले उल्लेखनीय योगदान, विद्यार्थ्यांसाठी केलेले कार्य तसेच सामाजिक क्षेत्रातील योगदान या विविध निकषांचा विचार करून शिक्षण समिती अध्यक्ष लायन शिल्पा पानवलकर व शिक्षण समितीच्या वतीने या पुरस्कारार्थींची निवड करण्यात आली आहे.

शिक्षक दिनाच्या निमित्ताने समाज घडविणाऱ्या या शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्याच्या लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, सर्व पुरस्कार विजेत्या शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button