
सिंधुरत्न समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रस्ताव सादर करावेत- डॉ विनय नातू
भाजपा कार्यालयात झाली महत्वाची बैठक

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या ‘सिंधुरत्न समृद्धी योजना २.०’ अंतर्गत पर्यटन, शेती, मत्स्यव्यवसाय, बचत गट तसेच नाविन्यपूर्ण योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय जनता पक्ष, रत्नागिरी दक्षिणच्या वतीने रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्या विशेष दौऱ्याचे आणि बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीला जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, दक्षिण मंडल अध्यक्ष दादा दळी, उत्तर मंडल अध्यक्ष विवेक सुर्वे, शहर मंडल अध्यक्ष दादा ढेकणे, महिला मोर्चा प्रदेश सचिव ऐश्वर्या जठार, उत्तर जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर, जिल्हा ऊपाध्यक्ष बावा नाचणकर यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी डॉ. नातू यांनी ‘सिंधुरत्न समृद्धी योजना २.०’ अंतर्गत समाविष्ट असलेल्या विविध घटकांची सविस्तर माहिती दिली. तसेच जिल्हा नियोजन समितीअंतर्गत येणाऱ्या विविध विषयांबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. या योजनांचा बारकाईने अभ्यास करून रत्नागिरी तालुक्यातून जास्तीत जास्त प्रस्ताव सादर होतील, यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
संघटनात्मक विषयांवर मार्गदर्शन करताना ‘एसआयआर’, ‘मन की बात’ यांसारखे कार्यक्रम गांभीर्याने राबवून संघटना प्रत्येक बूथपर्यंत पोहोचविण्यावर विशेष लक्ष द्यावे, अशा सूचनाही डॉ. नातू यांनी केल्या.




