
जनतेच्या सेवेसाठी ‘जनसंपर्क कार्यालय’;जिल्हा परिषद सदस्य ॲड. महेंद्र मांडवकर यांच्या कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन
रत्नागिरीतील जावकर प्लाझा येथे कार्यालय सुरू; शेकडो कार्यकर्ते, शुभचिंतकांची उपस्थिती
रत्नागिरी, दि. २३ ऑगस्ट : रत्नागिरी-पावस जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य तसेच जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्रच्या रत्नागिरी विभागाचे जिल्हाध्यक्ष ॲड. महेंद्र रुक्मिणी वसंत मांडवकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला. रत्नागिरी शहरातील जावकर प्लाझा, जयस्तंभ येथे हे कार्यालय सुरू करण्यात आले असून या कार्यक्रमाला शेकडो कार्यकर्ते, शुभचिंतक आणि नागरिक उपस्थित होते.
पालकमंत्री उदय सामंत यांना तातडीच्या कामानिमित्त चाकण येथे जावे लागल्याने ते कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश भगवान सांबरे आणि पंचायत समिती सदस्य नेताजी पाटील यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जिजाऊ संस्थेचे सचिव केदार चव्हाण, रत्नागिरी तालुका अध्यक्ष मंदार नैकर, लांजा तालुका अध्यक्ष योगेश पांचाळ, सचिन गोताड, साहिल गोरे, दीपक सांबरे, बंटी महाकाळ, कैलास आडवीरकर, राज फुटक, मंदार मांडवकर, शिवसेना उपतालुकाप्रमुख विलास उर्फ बंधू वारीशे, पावस जिल्हा परिषद गट उपविभाग प्रमुख प्रवीण शिंदे, पंचायत समिती सदस्य नामदेव कोकरे, पावस विभाग समन्वयक अजय तेंडुलकर, निलेश गजने यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व शुभचिंतक उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी ॲड. महेंद्र मांडवकर यांना पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच नागरिकांच्या प्रश्नांसाठी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
नागरिकांना मिळणार विविध सेवा मोफत
या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय योजनांचे फॉर्म भरणे, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र यासाठी अर्ज करणे तसेच संबंधित अर्जांचा पाठपुरावा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय जिजाऊ संस्थेच्या शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांबाबतही नागरिकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. या सर्व सेवा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
खेड्यापाड्यातून शासकीय कामांसाठी शहरात येणाऱ्या सामान्य नागरिकांना कार्यालयीन प्रक्रियेत होणारा त्रास कमी व्हावा आणि त्यांना आवश्यक मार्गदर्शन एकाच ठिकाणी मिळावे, हा जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यामागील मुख्य उद्देश असल्याचे ॲड. महेंद्र मांडवकर यांनी सांगितले.
कार्यालयाचा पत्ता : जावकर प्लाझा, जयस्तंभ, जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी, ई-विंग, पहिला मजला, गाळा क्रमांक १ व २, रत्नागिरी.
संपर्क : ९४२३२९२५७५




