
गणेशोत्सवातील ६ फुटांवरील पीओपी मूर्तीच्या विसर्जनाला कोर्टाचा ग्रीन सिग्नल मिळाल्याने गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण
दरवर्षी गणेशोत्सव जवळ आला की, मूर्तिकार आणि सार्वजनिक मंडळांच्या गळ्यात एकच घोर असतो यंदा पीओपी मूर्तीवर बंदी येणार का? मोठ्या मूर्तीचं काय होणार? यंदा मात्र उत्सवाचे ढोल वाजण्यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाने या चिंतेला पूर्णविराम दिला – आहे. एका महत्त्वपूर्ण आणि तात्पुरत्या दिलाशामुळे यंदाही ६ फुटांपेक्षा जास्त उंचीच्या पीओपी गणेशमूर्तीचे विसर्जन थेट समुद्र, नद्या किंवा तलावांसारख्या नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये करता येणार आहे. न्यायालयाच्या या भूमिकेमुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी (२४ जुलै २०२५ रोजी) जो अंतरिम (तात्पुरता) आदेश दिला होता, तोच आदेश यंदाही कायम ठेवला आहे. या प्रकरणावर न्यायालयाचा अंतिम आणि ठोस निकाल येत नाही, तोपर्यंत हीच व्यवस्था लागू राहील. कोर्टाच्या या भूमिकेमुळे विसर्जनाच्या नियमाचा संभ्रम आता पूर्णपणे मिटला आहे.




