️राहुल गांधींच्या कार्यक्रमापूर्वी पुण्यात दंगल घडविण्याचा भाजपचा प्रयत्न; काँग्रेसचा आरोप!

पुणे : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गुंज’ या कार्यक्रमाला मिळणारा मोठा प्रतिसाद पाहून भारतीय जनता पक्षाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच काही तरुणांनी येऊन शुक्रवारी रात्री धुमाकूळ घालण्याचा प्रयत्न केला. हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते नव्हते तर ते भाजपचे कार्यकर्ते होते. राहुल गांधींच्या कार्यक्रमापूर्वी त्यांना गोंधळ घालून कर्फ्यू लवायचा होता. असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप वर केला.

सीओईपी येथील वसतीगृहात अभाविप आणि काँग्रेस कार्यकर्ते यांच्यात शुक्रवारी रात्री बाचाबाची झाली. कोणता घालणारे तरुण दुसरे होते. भाडोत्री लोक होते, नशापाणी करून आले होते. त्यांनी तिथे दंगलसदृश परिस्थिती निर्णाण करण्याचा प्रयत्न केला. त्यांना कर्फ्यु लावायचा होता, असा थेट आरोप सपकाळ यांनी केला. जे लोक काल रात्री घटनास्थळी नव्हते त्यांच्यावरच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मध्यरात्रीच्या गोंधळानंतर पोलिसांकडून जी अपेक्षा होती त्यानुसार ते वागले नाहीत, असेही सपकाळ म्हणाले. पोलिसांनी राजकीय कारवाई केली वस्तुनिष्ठ कारवाई केलीच नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी माध्यमांची संवाद साधला. त्यामध्ये ते बोलत होते.

प्रदेशाध्यक्ष सकपाळ म्हणाले, रात्री घडलेल्या प्रकाराचे चित्रीकरण झाले आहे. चुकीची कोणतीही घटना घडू नये यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो मात्र दुसऱ्या गटाचा दंगल सदृश्य स्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न होता. या घटनेमुळे आम्ही आमचे लक्ष विचलित होऊ देणार नाही. या घटनेचा सर्व स्तरावर पाठपुरावा केला जाईल.

घटनास्थळी काँग्रेसचे लोकसंख्येने जास्त होते आणि भाजपचे कमी. काँग्रेस कार्यकर्त्यांनी सुरुवातीला संयमाची भूमिका घेतली. मात्र भाजपने मागवलेले भाडोत्री लोक आक्रमक होते. शिवीगाळ करत होते. त्यांनी कायदा हातात घेतला. पण पोलीस खात्याने चोर सोडून संन्यासाला फाशी हे धोरण स्वीकारत काम केल्याचा आरोप सकपाळ यांनी केला.

त्या विद्यार्थिनींची स्वतःची भूमिका

या प्रकरणावर एका विद्यार्थिनीने व्हिडीओ शेअर करून आपली भूमिका मांडली होती. या व्हिडीओवर काँग्रेस नेते सपकाळ यांनी प्रतिक्रिया देताना संबंधित विद्यार्थिनीला या वादात ओढण्याचे समर्थन केले नाही. ती विद्यार्थिनी आहे. तिची स्वतःची भूमिका आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी तिला बोलायला सांगितलेले नाही, असे स्पष्टीकरण सपकाळ यांनी दिले. या प्रकरणात चुकीचे वर्तन करणाऱ्यांवर कारवाई झाली नसल्याचा आरोपही सपकाळ यांनी केला. ‘दोन्ही गटांवर गुन्हे दाखल व्हायला हवे होते. आमचे लक्ष्य लोकांचे प्रश्न ऐरणीवर आणणे हे आहे,’ असेही त्यांनी सांगितले.

भाजपचा भ्रम विद्यार्थीच मोडतील

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला पुण्यासह राज्यातील विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे भाजपमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राहुल गांधी यांच्या कार्यक्रमात विघ्न यावे यासाठी भाजपचे नेते प्रयत्नशील असल्याचा आरोप देखील सपकाळ यांनी केला. मात्र या कार्यक्रमाला उपस्थिती लावून तरुणाईच भाजपचाभ्रम मुळे असा विश्वास सकपाळ यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला येऊ नये, यासाठी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. मुलींनी पुढे येऊन भाजपचा हेतू आणून पाडला, असेही सपकाळ म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button