
पर्यावरण संवर्धनातील धडाडीची तोफ थंडावली…. ॲड.तृप्ती गायकवाड काळाच्या पडद्याआड
१६ ऑगस्ट २०२६ च्या रात्री पर्यावरण संवर्धनातील धडाडणारी तृप्ती नावाची तोफ अचानक थंड झाली .
………..ॲड. तृप्ती गायकवाड……. पर्यावरण संवर्धन आणि प्रामुख्याने भग्न मूर्ती आणि देवदेवतांचे फोटो याच्या विघटनात वाघिणीच्या ताकदीने संपूर्णम् सेवा फाउंडेशन या त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून सतत धडाडणारी तोफ अचानक बंद झाली… तीही कायमची… विश्वास l नाही…. अनेक वर्ष सहयोगी संस्था म्हणून काम सुरू राहिलं आणि नुकतेच एक नव क्षेत्र आम्ही एकत्रित सुरू करणार होतो….
पण अचानक तुम्ही सर्वांना सोडून गेलात… यामुळे पर्यावरण संवर्धन कार्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.त्यांच्या कार्याला आणि स्मृतींना शब्द सुमनांजली.
डॉ. प्रशांत परांजपे.
..ॲडव्होकेट तृप्ती श्रीकांत गायकवाड या नाशिकमधील एक सुप्रसिद्ध विधीतज्ज्ञ (वकील) आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या, ज्या प्रामुख्याने त्यांच्या 'संपूर्णम सेवा फाउंडेशन' (Sampurnam Seva Foundation) या संस्थेच्या माध्यमातून केलेल्या नाविन्यपूर्ण पर्यावरणपूरक कार्यासाठी ओळखल्या जातात.
त्यांनी पुणे विद्यापीठातून कायद्याची पदवी (B.S.L. LL.B.) पूर्ण केली आहे. त्यांचे शालेय शिक्षण जनता विद्यालय, येवला येथून झाले असून, त्यांनी नाशिकच्या N.B.T. लॉ कॉलेजमधून कायद्याचे पुढील शिक्षण घेतले.कायदेशीर सराव (Legal Practice): त्या कौटुंबिक न्यायालय (Family Court), दिवाणी न्यायालय (Civil Court) आणि अपघात नुकसानभरपाई दाव्यांशी (Accident Claims) संबंधित प्रकरणांमध्ये काम करीत होत्या.नाशिकच्या शरणपूर रोड भागातील विश्वेश्वर अपार्टमेंटमध्ये त्यांचे कार्यालय आहे.‘संपूर्णम सेवा फाउंडेशन’ या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्यात झेप घेतली होती. ॲड. तृप्ती गायकवाड यांनी २०१९ मध्ये नाशिकमध्ये ‘संपूर्णम सेवा फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना केली. गोदावरी नदीच्या किनारी लोकांना देव-देवतांच्या जुन्या व खंडित मूर्ती किंवा फोटो फ्रेम विसर्जित करताना पाहून त्यांना या वस्तू रिसायकल करण्याची कल्पना सुचली.
मूर्ती व फोटोंचे रिसायकलिंग: त्या लोकांकडून कचऱ्यात किंवा झाडांखाली टाकलेल्या देव-देवतांच्या खंडित मूर्ती, फोटो फ्रेम आणि जुनी धार्मिक पुस्तके जमा करतात. लोकांच्या धार्मिक भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेत प्रथम या वस्तूंचे विधिवत पूजन केले जाते आणि नंतर त्यांचे आधुनिक पद्धतीने रिसायकलिंग केले जाते.
: प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) पासून बनलेल्या मूर्तींना पावडर स्वरूपात बदलून त्यापासून गरीब मुलांसाठी खेळणी आणि भटक्या प्राण्यांसाठी खाऊचे बाऊल (Feeding Bowls) बनवले जातात. लाकडी फ्रेम्सचा वापर करून पक्ष्यांसाठी घरटी (Birdhouses) तयार केली जातात.पर्यावरण संवर्धन: त्यांच्या या उपक्रमामुळे आतापर्यंत हजारो मूर्ती आणि फ्रेम्स नद्यांमध्ये जाण्यापासून वाचल्या आहेत, ज्यामुळे गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यास मोठी मदत झाली आहे. त्यांच्या या अनोख्या कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावर ‘फेमिना’ आणि ‘युअरस्टोरी’ (YourStory) सारख्या नामांकित माध्यमांनी देखील घेतली आहे.विधी क्षेत्रातील कामासोबतच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि समाजातील वंचित घटकांना मदत करण्यासाठी त्यांचे कार्य अत्यंत प्रेरणादायी मानले जाते.
दापोलीतील निवेदिता प्रतिष्ठान आणि महाड येथील मणीरी वेस्ट या कोकणातील संस्थांच्याही समवेत त्यांचे कार्य सुरू होते.
त्यांचे काम सहयोग संस्था म्हणून पुढे नेणार एक मोठा आव्हान त्यांच्या सहयोगी संस्था आणि कार्यकर्त्यांवर त्यांच्या अचानक जाण्यामुळे येऊन ठेपल आहे.
१६ ऑगस्ट २०२६ च्या रात्री पर्यावरण संवर्धनातील धडाडणारी तृप्ती नावाची तोफ अचानक थंड झाली .त्यांच्या जाण्यामुळे पर्यावरण संवर्धनात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला असून स्वतःच्या संस्थेसमवेत आता त्यांचे काम पुढे सुरू ठेवणे हीच त्यांना आता खरी श्रद्धांजली ठरेल अशी प्रतिक्रिया त्यांच्या सहकारी संस्था आणि कार्यकर्त्यातून उमटत आहे.




