मुंबईत भीषण दुर्घटना! गाढ झोपेत असताना कोसळला डोंगर; 6 जणांचा मृत्यू,


मुंबईत कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने धुमाकूळ घातलेला असतानाच मध्यरात्रीच्या सुमारास एक दुर्घटना घडली आहे. घाटकोपर पूर्व आणि साकीनाक्याच्या मध्यभागी असलेल्या अशोक नगर परिसरातील गौसिया चाळीवर अचानक डोंगराचा मोठा भाग काही घरांवर कोसळला.आज पहाटे 3 ते 4 च्या सुमारास घडलेल्या या भीषण भूस्खलनात 3 ते 4 घरे पूर्णपणे ढिगाऱ्याखाली गाडली गेली.

या अपघातात 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अजून काही लोक ढिगाऱ्याखाली अडकले असून त्यांना वाचवण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button