मालगुंड आरोग्य केंद्राच्या वतीने उंडी येथे सर्वसमावेशक आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद


रत्नागिरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड यांच्या वतीने आरोग्य उपकेंद्र वरवडे अंतर्गत उंडी येथे सर्वसमावेशक आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न झाले. ग्रामस्थांनी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध आरोग्य सुविधांचा लाभ घेतला.
शिबिरामध्ये एक्स-रे, ईसीजी (ECG), रक्त तपासणी, एनसीडी (NCD) तपासणी, वजन व उंची मोजणी, तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी तसेच आरोग्यविषयक समुपदेशन व मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी रिळ-उंडीचे सरपंच राकेश महाडिक, उपसरपंच पूजा घावळी, वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋषिकेश डोके, आरोग्य निरीक्षक डॉ. परशुराम निवेंडकर, नेत्र चिकित्सक उगवेकर, समुदाय आरोग्य अधिकारी (CHO) अक्षता शिर्सेकर, पोलीस पाटील सान्वी घावळी, आरोग्य सेविका अर्चना आपकरे व दीपा गावडे, आरोग्य सेवक मंडले, सुरेश अंबुरे व संकेत कासेकर, अंगणवाडी सेविका अंजली पारकर, सीआरपी (CRP), मदतनीस चंदा विचारे तसेच आशा सेविका सपना पवार उपस्थित होत्या.
शिबिरात एकूण 72 नागरिकांनी तपासणी केली. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंडच्या आरोग्य पथकाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आरोग्य निरीक्षक डॉ. परशुराम निवेंडकर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button