
कशेडी घाटात बाजूपट्टीचा भराव खचला
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बाजूपट्टीचा भराव खचल्याने वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. मुसळधार पाऊस पडल्यास रस्ता वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रस्त्यालगतचे लोखंडी गर्डरही हवेत लटकले असून राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या कारभारावर ताशेरेच उढले जात आहेत. खचलेल्या रस्त्यामुळे मार्गच वाहतकीसाठी धोकादायक बनला असून वाहन चालकांचा जीव टांगणीवर आहे. खचलेल्या रस्त्यामुळे दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.



