देवरुखच्या शिवकालीन इतिहासाचा शोध, क्रांती व्यापारी संघटना आणि आठल्ये सप्रे महाविद्यालय यांची संयुक्त संशोधन मोहीम


देवरुखच्या इतिहासातील एक महत्त्वाचे पण फारसे चर्चेत न आलेले पान पुन्हा उलगडण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. इ.स. १६६६ मध्ये झालेल्या बॅटल ऑफ देवरुख या ऐतिहासिक घटनेचा पुराव्यांच्या आधारे अभ्यास करण्यासाठी क्रांती व्यापारी संघटना आणि आठल्ये सप्रे महाविद्यालय यांनी संयुक्त संशोधन मोहीम हाती घेतली आहे. या उपक्रमामुळे देवरुखच्या शिवकालीन इतिहासावर नव्याने प्रकाश पडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
देवनगरी देवरुख या पर्यटन संकल्पनेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या उपक्रमादरम्यान धार्मिक, सांस्कृतिक, नैसर्गिक आणि ऐतिहासिक वारशाचा अभ्यास करण्यात आला. त्यावेळी इतिहासग्रंथांमध्ये उल्लेख असलेली इ.स. १६६६ मधील बॅटल ऑफ देवरुख ही घटना संशोधकांच्या लक्षात आली. उपलब्ध संदर्भानुसार, पुरंदरच्या तहानंतर छत्रपती शिवाजी महाराज आण्यात नजरकैदेत असताना आदिलशाहीचे सरदार पीरमिया आणि ताजखान यांनी देवरुख येथे लष्करी तळ उभारला होता. त्यानंतर स्वराज्याच्या वतीने आनंदराव आणि व्यंकोजी दत्तो यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने देवरुखवर मोहीम राबवून आदिलशाही सैन्याचा पराभव के ल्याचा उल्लेख काही इतिहासग्रंथांमध्ये आढळतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button