चिपळूण शहरातील जुन्या बसस्थानकात अतिक्रमणाचा पुन्हा विळखा


चिपळूण येथील जुन्या एसटी बसस्थानक परिसरात पुन्हा एकदा अतिक्रमणाचा विळखा वाढल्याने एसटी बसेस स्थानकाच्या आवारात न नेता रस्त्यावरच उभ्या करून प्रवाशांची चढ-उतार केली जात आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोडी वाढत असून प्रवाशांच्या सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
एस्टी महामंडळाच्या मालकीच्या जागेत खाजगी दुचाकी, चारचाकी, रिक्षा तसेच लिंबू व भाजी विक्रव्यांनी अतिक्रमण केल्याने बसेसना स्थानकात प्रवेश करणे अवघड झाले आहे. परिणामी चालकांना नाईलाजाने रस्त्यावरच बस थांबवावी लागत असून प्रवाशांनाही भररस्त्यात चढ-उतार करावे लागत आहे.
काही महिन्यापूर्वी आगार व्यवस्थापक दीपक चव्हाण यानी या ठिकाणी धडक कारवाई करून खाजगी वाहनांना प्रवेशबंदी केली होती. तसेच विक्रेत्यांनाही हटवून कर्मचारी नियुक्त केल्यामुळे काही काळ बसेस स्थानकाच्या आत उभ्या राहून प्रवाशाची सुरक्षित चढ-उतार होत होती. मात्र सध्या पुन्हा पूर्वीचीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button