प्रशासक नियुक्तीनंतर शनीशिंगणापूरच्या श्री शनैश्वर देवस्थानच्या उत्पन्नात वाढ

शनिशिंगणापूर (ता. नेवासा) येथील प्रसिद्ध शनैश्वर देवस्थानवर प्रशासक नियुक्तीस ९ महिन्यांचा कालावधी लोटला आहे. प्रशासक नियुक्तीनंतर देवस्थानच्या उत्पन्नात ४८ कोटी रुपयाहून ६३ कोटी रुपयांची (२०२५-२६) वाढ झाली आहे.प्रशासक नियुक्तीतून देवस्थानच्या कारभारात काही सुधारणा, सुसुत्रता, भाविकांसाठी काही सोयीसुविधा झाल्या तरी अद्यापि अनेक आव्हाने प्रशासक यंत्रणापुढे उभी ठाकलेली आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या गेल्या वर्षीच्या अधिवेशनात श्री शनैश्वर देवस्थान विश्वस्त व्यवस्थेचे (शनिशिंगणापूर) अनेक गैरव्यवहार उघड केले. त्यानंतर देवस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करून २७ सप्टेंबर २०२५ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली. त्यानंतरही विश्वस्त मंडळ व प्रशासक यांच्यामध्ये न्यायालयीन लढा सुरू होता. अखेर १९ डिसेंबर २०२५ रोजी नाशिक विभागीय आयुक्त प्रविण गेडाम यांची प्रशासक म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नियुक्ती झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button