गिरीजा राऊत प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी – रत्नागिरी दक्षिण महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौं. वर्षा ढेकणे याची मागणी


गिरीजा राऊत यांनी केलेल्या तक्रारीची सखोल, निष्पक्ष व तातडीने चौकशी करून चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिणच्या जिल्हाध्यक्षा सौ. वर्षा परशुराम ढेकणे जिल्हा सरचिटणीस सौं नुपुरा मुळ्ये सौं श्रुती ताम्हणकर उपाध्यक्ष शीतल रानडे, संगीता कवितके ,रुपाली कदम,स्नेहा चव्हाण मंडल अध्यक्ष सुचिता नाचणकर, भक्ती दळी ,अदिती गुडेकर,अनघा साळवी ,ध्रुवी लाकडे, शिवानी रेमूळकर, सुमन घाणेकर सायली काटकर ,सुप्रिया बेंद्रे, सुयोगा जठार, सायली बेर्डे, सरिता आंबेकर ,सुमन झगडे, रोहिणी सुर्वे, प्रीती शिंदे, राजश्री मोरे, प्रज्ञा शिवगण ,मेधा देवस्थळी,वर्षा खंडकर,दिक्षा गजने ,सायली वाजे ,सुप्रिया देवरुखकर,नेहा दाते ,शामल निगडे,माधवी शिंदे ,माधुरी शिंदे ,विद्या शेट्टी ,लेना फुटक,अनुष्का शेलार, विजया भाटकर, प्रज्ञा टाकळे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, गिरीजा राऊत यांनी त्यांच्यावर झालेल्या कथित अत्याचाराबाबत तक्रार केली असून, हे प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा राजकीय, सामाजिक किंवा इतर कोणताही दबाव न येऊ देता निष्पक्ष चौकशी करून पीडितेला न्याय मिळेल, याची दक्षता पोलिस प्रशासनाने घ्यावी.

तसेच तक्रारीमध्ये अघोरी प्रथा, अंधश्रद्धा किंवा इतर कोणत्याही बेकायदेशीर कृत्यांबाबत आरोप करण्यात आले असतील, तर त्या आरोपांची पुराव्यांच्या आधारे स्वतंत्र व सखोल चौकशी करून संबंधित कायद्यांनुसार आवश्यक ती कारवाई करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये तातडीने व निष्पक्ष कारवाई झाल्यास समाजात कायद्यावरील विश्वास अधिक दृढ होईल, असे मत व्यक्त करत सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांनी या प्रकरणात न्याय्य व पारदर्शक कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button