रत्नागिरीत अंड्याचे दर डझनाला


सर्वसामान्यांच्या आहारातील महत्त्वाचा आणि प्रथिनांचा स्वस्त स्रोत मानले जाणारे अंडे आता महागाईच्या झळा सोसत आहे. रत्नागिरीच्या बाजारपेठेत अंड्यांच्या किमतीने चक्क शंभरी गाठली असून, एका डझनासाठी ग्राहकांना १०० रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे घरगुती ग्राहकांसह हॉटेल व्यावसायिकांच्याही अडचणी वाढल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात अंड्यांची मोठ्याप्रमाणावर मागणी असून, त्याचा पुरवठा प्रामुख्याने सांगली आणि मिरज भागातून केला जातो. मात्र, उत्पादक बाजारातच अंड्यांच्या विक्रीचे दरही वाढले आहेत. दरात मोठी वाढ झाल्याने त्याचा थेट परिणाम स्थानिक बाजारावर झाला आहे. व्यापार्‍यांना वाढीव दराने अंडी खरेदी करावी लागत असल्याने किरकोळ विक्रीचे दरही वाढले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button