
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीतर्फे १९ जुलै रोजी यशवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
१० जुलैपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन.
रत्नागिरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षात दहावी, बारावी, डिप्लोमा आणि पदवी परीक्षेत उज्वल यश संपादन करणाऱ्या यशवंत विद्यार्थी यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम १९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन कार्यालय (सिव्हिल हॉस्पिटल शेजारी) येथे होणार आहे.
रत्नागिरी तालुक्यातील ६५ टक्क्यांपेक्षा पेक्षा जास्त गुण प्राप्त करणाऱ्या बौद्ध समाजातील विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रासह आपली नोंदणी १० जुलैपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन कार्यालय (सिव्हिल हॉस्पिटलशेजारी) येथे करावी, असे आवाहन अध्यक्ष एल. व्ही. पवार यांनी केले आहे.




