
रत्नागिरी शहरानजीकच्या कारवांचीवाडी येथे पार्किंगमधून दुचाकी चोरीला
रत्नागिरी शहरानजीकच्या कारवांचीवाडी येथे रहिवासी इमारतीच्या पार्किंगमधून दुचाकी चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी ५ ते रात्री ८.३० वाजण्याच्या कालावधीत घडली. या प्रकरणी यश सुनील ढेकणे (२१, रा. कारवांचीवाडी, रत्नागिरी) यांनी याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यश याने आपली दुचाकी (एमएच ०४ जेई ९३७३) कारवांचीवाडी येथील गंधर्व या रहिवासी इमारतीच्या पार्किंगमध्ये उभी करुन ठेवली होती. २१ जून रोजी ही दुचाकी चोरीला गेली, अशी तक्रार यश याने केली.www.konkantoday.com




