वेरळ येथील प्रगतशील शेतकरी सदानंद उर्फ आप्पा कदम यांनी कोकणात पिकवले सफरचंद


कोकण म्हटलं की आंबा, कोजू आणि कोकम हीच प्रमुख ओळख. मात्र बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील शेतीत नवे प्रयोग करण्याची गरज निर्माण झाली असताना वेरळ येथील प्रगतशील शेतकरी सदानंद उर्फ आप्पा कदम यांनी सफरचंद लागवडीचा यशस्वी प्रयोग करून कोकणातील शेतकर्‍यांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
सामान्यतः थंड हवामानासाठी प्रसिद्ध असलेल्या काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तर भारतातील डोंगराळ भागात सफरचंदाचे उत्पादन घेतले जाते. मात्र आता कोकणातील उष्ण व दमट हवामानातही सफरचंदाची लागवड यशस्वी होऊ शकते, हे आप्पा कदम यांच्या प्रयोगातून सिद्ध झाले आहे.
आप्पा कदम यांनी आपल्या शेतामध्ये ’ऍना’ या उष्ण प्रदेशासाठी उपयुक्त मानल्या जाणार्‍या सफरचंद जातीची तब्बल शंभरहून अधिक झाडे लावली आहेत. विशेष म्हणजे या झाडांना सध्या लहान-लहान फळेही लागले असून त्यांची वाढ चांगल्या प्रकारे होत आहे. त्यामुळे हा प्रयोग यशस्वी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.
गेल्या काही वर्षांपासून हवामान बदलाचा मोठा फटका कोकणातील आंबा उत्पादकांना बसत आहे. अवकाळी पाऊस, वाढते तापमान आणि बदललेले ऋतुचक्र यामुळे आंबा उत्पादनात लक्षणीय घट होत असून शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत पारंपरिक पिकांबरोबरच पर्यायी फळबागांची गरज अधोरेखित होत आहे. याच पार्श्वभूमौष सफरचंदासारख्या उच्च मूल्य असलेल्यो फळाची लागवड कोकणात यशस्वी होणे ही शेतकर्‍यांसाठी आशादायी बाब मानली जात आहे. बाजारात सफरचंदाला वर्षभर मोठी मागणी असून त्याला चांगला दरही मिळतो.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button