
१७ आरोग्य उपकेंद्रांना नवसंजीवनी, आ. किरण सामंत यांचे प्रयत्न
रत्नागिरीजा-राजापूर अनेक आरोग्य उपकेंद्रे आजही खासगी आयांमध्ये कार्यरत असून त्यांची दुरवस्था झाली आहे. ही उपकेंद्रों स्वतः च्या जागेत स्थलांतरित करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, १७ उपकेंद्रांच्या दुरुस्ती व देखभालीसाठी प्रत्येकी ११ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती आ. किरण सामंत यांनी दिली.
सोमवारी आ. सामंत यांनी जिल्हा परिषद कार्यालयाला भेट देऊन मतदारसंघातील विविध विकासकामांचा आढावा घेतला, यावेळी आरोग्य विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्हा परिषद उपाध्देश विलास चाळके, शिक्षण सभापती नंदा सुरकर तसेच जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आढावा बैठकीत आ. सामंत यांनी मतदार संघातील आरोग्य सुविधाच्या स्थितीबाबत| नाराजी व्यक्त केली. अनेक वर्षांपासून काही आरोग्य उपकेंद्रे खासगी जागांमध्ये सुरू असून, त्यांची अवस्था अत्यंत जीर्ण झाली असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. या उपकेंद्रांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध असूनही कामांना अपेक्षित गती मिळत नसल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. मतदार संघातील १७ उपकेंद्रांसाठी प्रत्येकी ११ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या निधीचा प्रभावी वापर करून उपकेंद्राचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकार्यार्यांना दिल्या.
www.konkantoday.com




