
लग्नाच्या वर्हाडाच्या उत्पन्नातून राजापूर आगाराने कमावले १६ लाख
ऊन्हाळी हंगामातील एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये लग्नाच्या वर्हाडासाठी तब्बल १०५ जादा बसेस सोडून राजापूर आगाराने १६ लाख तीन हजार ७७२ रूपयांची कमाई केली आहे. लग्नाच्या वर्हाडासाठी सर्वाधिक गाड्या सोडून जास्तीतजास्त उत्पन्न मिळविणारे राजापूर आगार जिल्ह्यात अव्वल ठरले आहे.
गेल्या काही वर्षात लग्नाच्या वर्हाडासाठी वर्हाडी मंडळींकडून एस्टी बसेसची मागणी वाढली आहे. राजापुरात तर दरवर्षी एप्रिल व मे महिन्यातील लग्नाचे मुहूर्त साधण्यासाठी लग्नाच्या वर्हाडासाठी एस्टी बेस आरक्षित करण्यासाठी वर्हाडी मंडळी आगारात गर्दी करतात. राजापूर आगार प्रशासनाकडूनही दैनंदिन शेड्युल चालविताना मग तारेवरची कसरत करत वर्हाडी मंडळींना लग्नाच्या वर्हाडासाठी जादा – गाड्या पुरवाव्या लागतात.
www.konkantoday.com




