
मुंबईत बेस्ट बसचा दादर प्लाझाजवळ भीषण अपघात! दोन ठार, अनेक जखमी!
मुंबईतील दादर प्लाझा जवळ बेस्टच्या भाडे तत्वावरील विद्युत बसचा मोठा अपघात झाला आहे. या अपघातात चार पादचाऱ्यांना धडक बसली. त्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहें. अपघातामुळे कंत्राटी चालकाच्या प्रशिक्षणावर प्रश्नचिन्ह उभा राहिला आहें. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने रस्तात उभ्या असलेल्या जेसीबीवर बस आदळली आहें.
सोमवारी सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहें.अपघातात मोटार सायकल सह काही चारचाकी गाडयांना बसची धडक बसली आहें. या अपघातामुळे प्रवाशामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहें. बेस्टच्या भाडेतत्त्वावरील बसचा प्रवास दिवसेंदिवस धोक्याचा होत आहें.गेल्या तीन वर्षांत ९५८ अपघातांपैकी ८५ टक्क्यांहून अधिक अपघात भाडे त्तवावरील झाले आहें.
जानेवारी 2023 ते डिसेंबर 2025 या तीन वर्षांच्या कालावधीत बेस्ट बसचे 958 अपघात झाले. त्यामध्ये 77 जणांचा मृत्यू आणि 217 जण जखमी झाले. यापैकी 85% पेक्षा जास्त अपघात सुमारे 815 अपघात हे भाडेतत्त्वावरील बसशी संबंधित होते. 2025 मध्ये 606 मोठे आणि किरकोळ अपघात नोंदवले गेले असून त्यापैकी 582 अपघात भाडे त्तवावरील बसांचे होते.
2024-25 आर्थिक वर्षात झालेल्या 12 प्राणघातक अपघातांपैकी 10 अपघात भाडेत्तावावरील विदयुत बसचे होते. 2025-26 मध्ये बेस्ट बस अपघातांमधील 24 मृत्यूंपैकी 88% मृत्यू भाडेतत्वावरील बसशी संबंधित आहेत .



