
राजापूर पासपोर्ट सेवा केंद्र रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना उपयुक्त ठरत आहे.
भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालय व भारतीय टपाल विभाग यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेले राजापूर येथील पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र हे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त व नागरिकाभिमुख सुविधा केंद्र ठरत आहे. या केंद्रामुळे कोकणातील नागरिकांना पासपोर्ट सेवांसाठी मुंबई अथवा इतर महानगरांमध्ये वारंवार जावे लागत नसून वेळ, खर्च आणि श्रमांची मोठ्या प्रमाणात बचत होत आहे. आजपर्यंत राजापूर पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रामार्फत सुमारे ५३.२२५ नागरिकांनी पासपोर्ट सेवांचा लाभ घेतला.
राजापूर पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये पासपोर्ट अर्ज स्वीकृती, दस्तऐवज पडताळणी, बायोमेट्रिक नोंदणी तसेच इतर प्राथमिक प्रक्रिया सुलभ व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यात येतात. केंद्राच्या कार्यक्षम सेवेमुळे विद्यार्थी, परदेशात शिक्षण किंवा रोजगारासाठी जाणारे युवक, व्यावसायिक, उद्योजक, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठा लाभ होत आहे.
सध्या या केंद्रामध्ये दररोज सरासरी ४५ ते ४८ पासपोर्ट अर्जाची नोंदणी केली जाते, तर दरमहा सुमारे ४०० हून अधिक पोलीस पडताळणी प्रकरणांची प्रक्रिया पूर्ण करण्यात येते. आजपर्यंत राजापूर पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रामार्फत सुमारे ५३.२२५ नागरिकोनी पासपोर्ट सेवांचा लाभ घेतला असून केंद्राच्या कार्यक्षमतेबाबत समाधान व्यक्त केले आहे.
www.konkantoday.com




