पूर्णगड अणूउर्जा प्रकल्पविरोधी लढ्यात ठाकरे सेना आक्रमक


रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड आणि मेर्वी पंचक्रोशीत केंद्र व राज्य सरकारकडून प्रस्तावित असलेल्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात आता राजकीय रणशिंग फुंकले गेले आहे. स्थानिक जनतेच्या तीव्र असंतोषाला संघटित स्वरूप देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने अप्रत्यक्ष पुढाकार घेतला असून, या प्रकल्पाविरोधात पहिल्याच टप्यात जनआंदोलनाची पायाभरणी सुरू केली आहे.
पूर्णगड परिसरामध्ये रिलायन्स समूहाचा अणुऊर्जा प्रकल्प उभारला जाणार असल्याची निश्चित माहिती समोर आल्यानंतर संपूर्ण पंचक्रोशीतील स्थानिक नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासकीय पातळीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडलेले सामंजस्य करार आणि कोट्यवधी रुपयांच्या गुंतवणुकीचे दावे स्थानिक पातळीवर पोहोचताच, गावकर्‍यांच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर आला.
पूर्णगड आणि मेर्वी पंचक्रोशीतील ग्रामस्थांची एक अत्यंत महत्वपूर्ण आणि तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला दोन्ही गावांतील तसेच परिसरातील शेतकरी, बागायतदार आणि मच्छीमार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. येथील स्थानिक अर्थकारण है आंबा, काजू आणि भातशेती यांसारख्या पारंपरिक पिकांवर तसेच किनारपट्टीवरील समृद्ध मच्छीमारी व्यवसायावर अवलंबून आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button